spot_img
spot_img

जळगाव जामोदने गमावला उदयोन्मुख, सेवाभावी तरुण डॉक्टर

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा / ज्ञानदेव राजनकर) शहरावर शोककळा पसरवणारी हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील पुरुषोत्तम केला यांचे चिरंजीव डॉ. नयन केला वय 25 वर्ष यांचे दिनांक १५ मे २०२६ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. अल्पवयातच घडलेली ही घटना सर्वांना सुन्न करून टाकणारी आहे.

डॉ. नयन यांनी नागपूर येथून नुकतीच बीएएमएस पदवी संपादन केली होती व सध्या त्यांची इंटरशिप सुरू होती. वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावाने कार्य करण्याचे स्वप्न त्यांनी डोळ्यांत साठवले होते. मात्र, नियतीने त्यांना अचानक हिरावून घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हसतमुख, मनमिळावू आणि संवेदनशील स्वभावामुळे डॉ. नयन सर्वांच्या मनात घर करून होते. विशेष म्हणजे त्यांना प्राणी व पक्ष्यांविषयीही अपार प्रेम होते. त्यांच्या अकाली जाण्याने मित्रपरिवार, नातेवाईक आणि संपूर्ण समाज शोकमग्न झाला आहे.

त्यांच्या पश्चात आई-वडील व भाऊ असा परिवार असून, या दुःखद प्रसंगी ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना धैर्य व शक्ती देवो, हीच प्रार्थना व्यक्त केली जात आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!