spot_img
spot_img

‘तू कोण कलेक्टर आहेस का?’ – महिला कंडक्टरचा संताप, ST बसमध्ये थरारक राडा!

वरवट बकाल (हॅलो बुलडाणा) येथे एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. शेगाव आगाराच्या एका महिला कंडक्टरने प्रवाशांशी थेट उर्मट भाषेत वाद घालत बसमध्येच गोंधळ घातल्याचा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरवट बकाल येथून शेगावकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसमध्ये चढल्याने महिला वाहक आणि प्रवाशांमध्ये सुरुवातीला किरकोळ वाद झाला. मात्र, हा वाद काही वेळातच चिघळला आणि परिस्थिती हाताबाहेर गेली.

महिला कंडक्टरने जास्तीच्या प्रवाशांना खाली उतरवण्याचा प्रयत्न करताना संतापाच्या भरात प्रवाशांशी उद्धट भाषा वापरली. तू कोण कलेक्टर आहे का? होम मिनिस्टर आहे का? मोदी असला तरी मी काय करू? असे संतप्त वक्तव्य करत तिने प्रवाशांना झापल्याने बसमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. काही प्रवाशांना जबरदस्तीने खाली उतरवण्यात आल्याने गोंधळ अधिकच वाढला.

या सर्व प्रकाराचा व्हिडिओ काही नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केला असून तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. घटनेदरम्यान काही प्रवाशांनी महिला कंडक्टरला शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र ती कोणाच्याही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.

एसटी महामंडळाचे प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य असताना, अशा प्रकारची वर्तणूक नागरिकांमध्ये संताप निर्माण करणारी ठरत आहे. संबंधित महिला कंडक्टरवर प्रशासन कोणती कारवाई करणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!