spot_img
spot_img

भाऊसाहेबांच्या स्वप्नपूर्तीकरिता भाजपचा जिल्हा परिषद सत्ता मिळवण्याचा निर्धार!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) महानगरपालिका निवडणुकीत स्वतंत्र लढत देत राज्यात क्रमांक एकचा पक्ष ठरलेल्या भाजपचा आत्मविश्वास आता बुलढाणा जिल्हा परिषदेतही दिसून येतो आहे. माजी मंत्री स्व.भाऊसाहेब फुंडकर यांचे अपूर्ण स्वप्न साकार करण्यासाठी भाजपने स्वबळावर सत्ता मिळवण्याचा निर्धार केला असून, यासाठी पक्षाने रणनीती आखली आहे.

महायुतीतील घटकपक्ष शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यातील सत्तास्पर्धा उघडकीस आली असून, महानगरपालिकेतील भाजपच्या विजयानंतर हे पक्ष अधिक सावध भूमिका घेत आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांनी अनुभवलेला अपयश आणि ‘मविआ’ धडा बुलढाणा जिल्हा परिषद निवडणुकीत पुन्हा एकत्र येण्याची शक्यता निर्माण करतो. त्यामुळे आगामी निवडणूक केवळ सत्तेसाठी नव्हे, तर राजकीय दिशादर्शक ठरण्याची शक्यता आहे.

स्थानिक राजकारणात एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीची ताकदही मोठी असून, अनेक मतदारसंघांमध्ये त्यांचा प्रभाव निर्णायक ठरतो. भाजपने मागील काळात मित्रपक्षांचे वर्चस्व कमी करून स्वतःचा प्रभाव वाढवला; हे अनुभव जिल्ह्यातील शिंदेसेना व राष्ट्रवादीला सावध पावलांनी पुढे येण्यास भाग पाडू शकतात.

भाजपकडून स्वबळावर जिल्हा परिषद सत्ता मिळवण्याचा नारा दिला जाऊ शकतो. नगरपालिकेत शिंदेसेना विरोधात मोठा विजय मिळाल्यानंतर जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे आणि आमदार संजय गायकवाड यांच्यातील राजकीय वैर अधिक तीव्र झाला आहे. आता भाजपच्या रणनीतीवर जिल्हा राजकारणाचे खरे रंग दिसून येण्याची तयारी आहे, आणि भाऊसाहेबांच्या स्वप्नपूर्तीचा अध्याय जिल्हा परिषदेत लिहिला जाणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!