बुलढाणा (हॅलो बुलडाणा) वर्षानुवर्षे कागदोपत्रीच अस्तित्वात असलेल्या, प्रत्यक्ष व्यवहार शून्य असलेल्या आणि नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्या तालुक्यातील अवसायनातील सहकारी संस्थांवर अखेर सहकार विभागाने कठोर कारवाईचा बिगुल फुंकला आहे. तब्बल ३६ सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, यामुळे सहकार क्षेत्रातील गोंधळ, बेशिस्त आणि गैरव्यवहारांना मोठा दणका बसणार आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ अन्वये ही कारवाई सुरू असून, नियम ८९ (४) नुसार संबंधित संस्थांविरोधात कोणतेही दावे असतील तर जाहीर सूचनेपासून एका महिन्यात लेखी दावा, पुराव्यासह सादर करणे बंधनकारक आहे. अन्यथा, उशिरा येणाऱ्या दाव्यांची कोणतीही दखल घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा सहकार विभागाने दिला आहे.
या संस्थांवर यापूर्वीच अवसायक नियुक्त करण्यात आला असून, मालमत्ता, देणी-घेणी, कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाली आहे. आता केवळ अंतिम वैधानिक प्रक्रिया बाकी असून, त्यानंतर नोंदणी रद्द करण्याची अधिकृत घोषणा होणार आहे. विशेष म्हणजे, यात नागरी पतसंस्था, गृहनिर्माण संस्था, महिला सहकारी संस्था, बेरोजगार सेवा संस्था, ग्राहक भांडार अशा विविध प्रकारच्या संस्थांचा समावेश आहे.
दीर्घकाळ निष्क्रिय राहून सभासदांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या या संस्थांमुळे सहकार चळवळीची प्रतिमा मलिन झाली होती. आता मात्र ‘नियम मोडाल तर संपलात’ असा थेट संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे. संबंधित सभासद, ठेवीदार, कर्जदार व हितसंबंधित नागरिकांनी ही सूचना गांभीर्याने घ्यावी, अन्यथा भविष्यात कोणतीही तक्रार किंवा मागणी ग्राह्य धरली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या आहेत संस्था
जि.प. माध्य. शिक्षक व कर्मचारी सह. पत बुलडाणा र.न.२०४, सिंगगड गृहनिर्माण सह.संस्था म. बुलढाणा, सन्मित्र शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्म. सह. पतसंस्था. म. बुलडाणा ३१०, औंदुबर गृहनिर्माण सह.संस्था म. बुलडाणा, पिपल्स अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसा.म. बुलडाणा र.न.३१, सिंधुदुर्ग गृहनिर्माण सह.संस्था म. बुलडाणा, विवेकानंद नागरी सहकारी पत संस्था, म.बुलडाणा र.न.३२२, लो-इन. गृप गृहनिर्माण सह.संस्था म. बुलडाणा, शिवप्रताप ग्रामिण बिगर शेती सहकारी पत संस्था म. बुलडाणा, शिवाजी गृहनिर्माण सहकारी संस्था म. बुलडाणा, भाग्योदय ग्रामिण बिगर शेती सह. पत संस्था. म. देऊळघाट र.न.३३८, तिरुपती नं.१ गृहनिर्माण सह.संस्था म. बुलडाणा, धनलक्ष्मी नागरी सहकारी पत संस्था, म.बुलडाणा र.न.३४३, माँ.जगदंबा आदिवासी उपसा जलसिंचन सह. संस्था, कामेश्वर ग्रामिण बिगर शेती सह. पत संस्था, म. वरवंड र.न.३५२, आदर्श सुशिक्षीत बेरोजगार सेवा सह.संस्था म.बुलडाणा, विदर्भ नागरी सहकारी पत संस्था, म. बुलडाणा र.न.३५८.
जगदंबा सुशिक्षीत बेरोजगार सेवा सह.संस्था म.बुलडाणा, जयजवान जय किसान सहकारी ग्राहक भांडार, लोक कल्याणी महिला नागरी सहकारी पत संस्था. म. बुलडाणा र.न.३६०, अहिल्या पगारदार सेवकांच्य सहकारी पतसंस्था म. बुलडाणा, महात्मा ज्योतीबा फुले ग्रामिण बिगर शेती सह. पतसंस्था म. रायपूर, प्रियदर्शनी महिला नागरी सहकारी पतसंस्था म. बुलडाणा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मा. औद्यो.सह.संस्था म. बुलडाणा, शेतकरी गृहनिर्माण सह.संस्था म. बुलडाणा, जिजाऊ महिला ओद्यो.सह.संस्था म. बुलडाणा, राजे छत्रपती हमाल कामगार सह. संस्था म. बुलडाणा, जगदिश्वर गृहनिर्माण सहकारी संस्था, म.बुलडाणा र.न. ३५४, व्यंकटेश गृहनिर्माण सहकारी संस्था, म.माळविहीर र.न.३४६., तारकेश्वर गृहनिर्माण सहकारी संस्था, म.बुलडाणा र.न.३५५, तिरुपती गृहनिर्माण सहकारी संस्था, म.माळविहीर र.न.३४७, गगनगिरी गृहनिर्माण सहकारी संस्था, म.बुलडाणा र.न.३५६, व्यंकटेश १ गृहनिर्माण सहकारी संस्था, म.माळविहीर र.न.३४९, स्वस्तिक शॉ अॅण्ड फ्लैट ओनर्स को. ऑप. हाऊ. सो. लि. बुलडाणा र.न.३७९, बालाजी १ गृहनिर्माण सहकारी संस्था, म.माळविहीर र.न.३५, ममलेश्वर गृहनिर्माण सहकारी संस्था, म.बुलडाणा र.न.३५३ अशा एकूण ३६ सहकारी संस्था या कारवाईच्या कक्षेत आहेत.












