spot_img
spot_img

‘मला आमदार झाल्यासारखं वाटतं..’ – उमेदवारीचे दावे प्रतिदावे..महायुती पेचात!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा/प्रशांत खंडारे) बुलढाणा विधानसभेत ‘समोर कोणीही असो,निवडणूक लढवणारच’, अशा थाटात शिवसेनेचे उबाठा जिल्हाप्रमुखच नाहीतर अनेकांनी गर्जना केली आहे. काही आतून तर काही बाहेरून डरकाळी फोडत आहेत. ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतं..’ हे गाणे सध्या इच्छुक उठता- बसता गुणगुणत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत होणारी संभाव्य रस्सीखेच चांगलीच रंगणार आहे. ज्यांना आमदारकीची संधी मिळणार आहे याविरोधात पक्षातूनच ठोकलेला शड्डू त्यांच्यात आडकाठी ठरत आहे. परिणामी इच्छुकांच्या भाऊ गर्दीमुळे महायुती पेचात सापडली आहे.

विधानसभेसाठी मित्रपक्षाच्या इच्छुकांनीही दंड थोपटलेले आहे. पेचात टाकणाऱ्या या राजकीय कुरघोळीमुळे या घडामोडींचा सामना बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील भाजपला करावा लागणार आहे.बुलढाणा विधानसभा
मतदारसंघातील राजकारण सर्वश्रुत आहे. येथे काहीही उलटापालट होऊ शकते. तरीही अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याने विधानसभा निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार आहे. या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आम. संजय गायकवाड, विजयराज शिंदे, जयश्रीताई शेळके, रविकांत तुपकर, प्रा.सदानंद माळी,दिलीप जाधव, हर्षवर्धन सपकाळ, योगेंद्र गोडे, संजय राठोड, जालिंदर बुधवत, टी. डी अंभोरे, मधुसूदन सावळे, नरेश शेळके, संजय हाडे, (कीर्तीताई पराड- ध्रुपदराव सावळे यांची कन्या), सतीश पवार, संदीप शेळके, मोहम्मद सज्जाद अशी बरीच मोठी मंडळी आहे. मागील मतदानावर दृष्टीक्षेप टाकला तर,संजय रामभाऊ गायकवाड
67,785 मते 26,075 आघाडी 37.83% मते
विजयराज हरिभाऊ शिंदे
वंचित बहुजन आघाडी
41,710 मते 23.28% मते,हर्षवर्धन सपकाळ
31,316 मते,
17.48% मते मिळाली होती. प्रश्न हा आहे की, कुणाला उमेदवारी मिळते आणि कोण बाजीगर ठरतो ? ही येणारी वेळ सांगणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!