spot_img
spot_img

झेंडा भाजपाचाच! विजयराज शिंदे म्हणाले… – कार्यकर्त्यांनो सज्ज व्हा!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) भाजपा जिल्हाध्यक्ष पदाची गळ्यात माळ पडल्यापासून नव्हे तर आधीपासूनच पायाला भिंगरी लावून कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणाऱ्या माजी आमदार विजयराज शिंदे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक भाजपाचे नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून येतील असा दावा केला आहे.प्रामुख्याने बुलढाणा नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकविण्यासाठी सज्ज व्हा! असे त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा जिल्हा संपर्क कार्यालय शिवालय येथे बुलढाणा शहर भाजपच्या प्रमुख पदाधिकारी यांची छोटेखानी बैठक 5 जुलै रोजी संपन्न झाली. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत ह्या निवडणूका कार्यकर्त्यांना व पक्षाला बळकटी देणाऱ्या निवडणुका आहेत. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ‘सबका साथ सबका विकास’ यामुळे जनसामान्यांत भाजपा पक्षाने आपली प्रतिमा उंचावली आहे. विकासाची ही गती अधिक तिव्र करण्यासाठी बुलढाणा नगर पालिकेत जास्तीत जास्त नगरसेवक व नगराध्यक्ष निवडून आणुन बुलढाणा नगर पालिकेवर भाजपचा झेंडा ताकदीने फडकविण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन माजी आ. विजयराज शिंदे यांनी उपस्थितांना केले. यावेळी शहराध्यक्ष मंदार बाहेकर व शहर भाजपचे आजी माजी नगरसेवक ,पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!