बुलढाणा (हॅलो बुलढाणा) येथील प्रगती सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्ष स्व. अरुणाताई कुल्ली यांच्या संगीतमय आठवणीसाठी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या शिष्या विजयालक्ष्मी मणेरीकर यांच्या आहताकडून अनाहताकडे जाणारा जीवन प्रवास या संगीतमय कार्यक्रमात शास्त्रीय रागदारी, भजन, ठुमरी,कजरी ,गझल विरह गीत अशा भाव संगीतात व्यक्त होणार्या संगीतमय मृगजळाची तृष्णा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन गोवर्धन सभागृह बुलढाणा अर्बन मुख्यालयासमोर या ठिकाणी दि. 1 जुलै सोमवारी सायंकाळी ठीक 6.30 वाजता करण्यात आले आहे. विजयालक्ष्मी मणेरीकर यांच्यासोबत दातृत्वी मणेरीकर ही देखील या कार्यक्रमात आपली गायन कला सादर करणार आहे. या संगीतमय मैफिलीसाठी की बोर्डवर- अनिल धुमाळ,तबला- सिद्धेश्वर पाटील, आक्टोपॅड -रोहित जाधव, हार्मोनियम – कृष्णा जाधव हे साथसंगत करणार असून या संगीतमय कार्यक्रमाचे निवेदन प्रज्ञा कुळकर्णी ह्या करणार आहे. प्रगती सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातुन स्व. अरुणाताईं कुल्ली यांनी बुलढाणा शहरात 22 वर्ष सातत्याने विविध व्याख्याने व संगीत मैफिलींचे आयोजन करून रसिकांची एक वेगळी फळी शहरात निर्माण केली आहे. यावर्षीपासून त्यांच्या स्मृती निमीत्त देण्यात येणारा अरुणाई पुरस्कार सेवा संकल्प प्रतिष्ठान पळसखेड सपकाळ येथे मनोरुग्ण माता बांधवांसाठी सेवा संकल्प प्रतिष्ठान मार्फत रुग्ण सेवा केली जाते. या प्रकल्पाचे संचालक आरती पालवे व नंदकुमार पालवे यांना त्यांच्या सेवेबद्दल अरुणाई पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वाती कन्हेर असणार आहेत. तर शीला किरण पाटील यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमासाठी असणार आहे. या कार्यक्रमासाठी बुलढाणेकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन व्रिक्ष फाउंडेशनच्या अध्यक्ष सुजाता कुल्ली यांच्यासह प्रगती सार्वजनिक वाचनालयाच्या तथा भगतसिंग क्रीडा , सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाच्या सर्व सदस्यांनी केले आहे.