spot_img
spot_img

💥POLITICS! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माय – मराठीच्या पाठीत खंजीर खुपसला! – मराठी ‘अस्मिता’ संपविण्याचा घाट! – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सूरा भोसकून घातल्याचा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती रद्द केली,असे सपकाळ यांनी सांगून जनतेची फसवणूक केल्याचे ते म्हणाले. सरकारचा जीआर काय सांगतो?हिंदी हीच शक्तीची तिसरी भाषा असणार,इतर कोणती भाषा शिकायची असल्यास किमान 20 विद्यार्थ्यांची अट,म्हणजेच पर्यायाचा देखावा आणि हिंदी लागण्याचा ठरलेला कट!असा आरोपही सपकाळ यांनी केला. हा महाराष्ट्रद्रोही अजेंडा असून,मराठी भाषा आणि अस्मिता व मराठी माणूस यांना संपविण्याचे षडयंत्र आहे.
फडणवीस, शिंदे, अजित पवारांची निष्ठा ही महाराष्ट्राशी नाही. दिल्लीश्वरांशी आहे, हेच यातून स्पष्ट होते. बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेणाऱ्या शिंदे गटाकडे शिक्षण खाते असून त्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला तश्याच प्रकारे मराठीचा खून पाडण्याची सुपारी घेतली आहे असेही सपकाळ म्हणाले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!