बुलढाणा (हॅलो बुलडाणा) सर्वत्र राम जन्मोत्सवाचा जल्लोष होत असताना, स्थानिक विष्णू वाडीतील संत गजानन महाराज मंदिरापासून श्रीराम जन्मोत्सवा निमित्त लक्षवेधी शोभायात्रा काढण्यात आली. या शोभा यात्रेतील जिवंत देखाव्यांनी डोळ्यांचे पारणे फेडले!
रामचंद्र महाराज अकोट यांचे डमरुपथक व श्री हनुमान यांची वेशभूषा यावेळी लक्ष वेधून घेत होती. ढोल पथक व वाद्यांच्या निनादात जय जय श्रीरामच्या निनादाने परिसर दुमदुमुन गेला होता.बुलढाणा शहरातील प्रमुख मार्गावरुन शोभायात्रेची परिक्रमा भारतमाता कारंजा चौकात पूर्ण झाली. संत गजानन महाराज यांच्या मंदिरात राम जन्मोत्सवा निमित्त महिलांनी पाळणा सादर केला.