बुलढाणा (हॅलो बुलडाणा) विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून चिखली येथील सहा आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याचा निकाल 3 मे रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश मा.मुगळीकर यांनी दिला आहे.
चिखली येथील रहिवासी असलेले शेख सलमान शेख गुलाब यांचा विवाह सन 2016 मध्ये निशा हीच्या सोबत झाला होता. हा विवाह प्रेम संबंधातून झाला होता.परंतु लग्नाच्या काही कालावधीनंतर निशा हीने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली अशी फिर्याद निशाच्या आईने चिखली पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली.पोलिसांनी विवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून कलम 306, 498,54,506,34 तसेच हुंडाबळी कलम कायदा तीन प्रमाणे गुन्हा नोंद केला. याप्रकरणी दोषारोपपत्र जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते.या प्रकरणात एकुण 11 साक्षीदार तपासण्यात आले. आरोपींच्या विधिज्ञांचा कौशल्यपूर्ण उलट तपास व प्रभावी युक्तिवादाच्या जोरावर जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. मुगळीकर यांनी 3 जून रोजी आरोपी शेख सलमान व इतर पाच अशा एकुण सहा आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपीच्या वतीने ॲड.निलेश कुमार सवडतकर,ॲड.अमर तायडे, ॲड.सागर पंजवाणी तसेच विधिज्ञ मदतनिस अविनाश हिवाळे व ॲड. सागर सवडतकर यांनी काम पाहिले.












Total Users : 3487289