मोताळा (हॅलो बुलडाणा) नगर पंचायतमध्ये मोठा राजकीय भूकंप घडला आहे. काँग्रेसचे उपनगराध्यक्ष शेख सलीम चुनावाले यांच्यासह सहा नगरसेवकांनी काँग्रेसला रामराम ठोकत थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. नागपूर येथे आयोजित भाजपा विदर्भ कार्यशाळेत प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष मा.आ. विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात या सर्वांनी अधिकृत प्रवेश केला.पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये कैलास खर्चे, तस्लीम बाबा, संदीप वानखेडे, आसिफ कुरेशी, विजय सुरडकर यांचा समावेश असून, सर्वजण काँग्रेसचे सक्रिय नगरसेवक होते. भाजपच्या कार्यपद्धतीने प्रभावित होत व जिल्हाध्यक्ष आमदार विजयराज शिंदे यांच्या प्रभावी नेतृत्वावर विश्वास ठेवून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, आतापर्यंत मोताळा नगरपंचायतीत भाजपाचा एकही नगरसेवक नव्हता. परंतु या एका घटनेने भाजपने काँग्रेसच्या गडात थेट सेंध घातली असून काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. येत्या काळात आणखी नगरसेवक भाजपाच्या संपर्कात असल्याचे संकेत मिळत आहेत, ज्यामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.या कार्यक्रमाला प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, खासदार अनिल बोंडे, खासदार अनुप धोत्रे, तसेच डॉ. गणेश मांटे, चंद्रकांत बरदे, दत्ता पाटील, पुरुषोत्तम लखोटिया यांची उपस्थिती होती