शेगाव (हॅलो बुलडाणा) स्थानिक मुख्य रस्त्यावरील पालडीवाल यांच्या पेट्रोल पंपावर रविवारी दुपारच्या सुमारास एक दुचाकी स्वार आपल्या दुचाकीत पेट्रोल भरून घेत असतानाच पेट्रोलच्या टाकीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. यावेळी पंपावरील कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखून अग्निशामक रोधक सिलेंडरने आग विझवून पुढील अनर्थ टाळला आहे.शेगाव येथील या घटनेमुळे पेट्रोल पंपावर मोठी धावपळ उडाली होती.परंतु दुचाकीच्या टाकीला आग कशी लागली याचे कारण कळू शकले नाही.
मात्र पेट्रोल पंप येथील कर्मचाऱ्यांनी व ग्राहकांनी सुद्धा दक्ष राहणे आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पेट्रोल पंपावर मोबाईल वापरताना काळजी घेतली नाही तर मोठी दुर्घटना घडू शकते. गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नये, पेट्रोल पंपावर मोबाईलवर बोलू नये, या गोष्टींची खबरदारी घेतली गेली नाही तर धोका निर्माण होतो. पेट्रोल पंपावर कोणी फोनवर बोलत असले तर त्या ठिकाणी असलेले कर्मचारी लगेच फोन ठेवायला सांगतात. तसेच पेट्रोल पंपावर धुम्रपान करु नका, मोबाईल फोन वापरु नका, अशी चेतावणी देणारी चिन्हीही असतात. पेट्रोल पंपावर मोबाईल न वापरण्यामागे कारण मोबाईल मधील इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहेत. या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे पेट्रोलची वाफ लागलीच पेट घेते. तसेच जवळच्या धातूच्या वस्तूंमध्ये विद्युतप्रवाह निर्माण करू शकते.यामुळे पेट्रोल पंपावर मोबाईल वापरता येत नाही.














