spot_img
spot_img

💥’ये तो अभी ट्रेलर है!’ “ऑपरेशन सिंदूर मोहीम फत्ते !” शिवसेना प्रवक्त्या जयश्रीताई शेळकेंनी केले भारतीय सैन्य दलाचे मनापासून अभिनंदन!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) पाकिस्तान विरुद्ध यशस्वी लष्करी कारवाई करणाऱ्या भारतीय सैन्य दलाचा भारतीय म्हणून आम्हाला सार्थ अभिमान आहे.’ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी लष्करी कारवाईसाठी भारतीय सैन्याचे मनापासून अभिनंदन’अशा शब्दात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी आभार व्यक्त केले आहे.

भारतीय सेनेने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते केली. भारतीय हवाई दलाने 6 मे रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. मध्यरात्री 1:28 वाजता ऑपरेशन सिंदूर सुरू होऊन 1:51 वाजता ते यशस्वीरित्या पूर्ण झाले. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले होते. उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेत भारतीय सेनेने पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेने बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचे हेडक्वार्टर उद्ध्वस्त केले आहे.दरम्यान या पाकिस्तान विरुद्ध यशस्वी लष्करी कारवाई करणाऱ्या भारतीय सैन्य दलाचे उबाठा शिवसेना गटाच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी अभिनंदन करून आभार मानले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!