बुलढाणा (हॅलो बुलडाणा) महाराष्ट्र पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर वादग्रस्त टीका करणारे आमदार संजय गायकवाड यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या इशाऱ्या नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्यातील आभार दौऱ्याच्या सभेत जाहीर समज दिली आहे. दरम्यान काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या संदर्भात आपली भूमिका मांडली. ‘सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने गृह विभागाचे दात गृह विभागाच्या घशात घातल्याचा’ मिडीयासमोर सपकाळ यांनी टोला लगावला.
आमदार संजय गायकवाड यांचे महाराष्ट्र पोलीस अकार्यक्षम असल्याचे विधान बरोबर आहे. कारण त्यांच्या घरासमोर त्यांची गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न झाला.त्यांच्या घराला हानी पोहोचण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या आरोपी सात आठ वर्षापासून अजून सापडले नाही.
त्यांच्या मुलाला धमकी देण्यात आली.त्याचेही आरोपी सापडले नाही.बुलढाणा शहर अवैध धंद्याचं माहेर घर होत आहे. शहर अवैध दारू, गांजाचे हब होत आहे. रेती उत्खनन व तस्करी धडाक्यात सुरू आहे.असे अवैध धंदे बोकाळल्याने पोलीस अकार्यक्षम असल्याचे आमदार संजय गायकवाड यांनी बरोबर म्हटले आहे. त्यांनी यापूर्वी पोलिसाला आपली गाडी देखील धुवायला लावली होती. त्यांचे असे बोलणे हे गृह विभागाचे दात गृह विभागाच्याच घशात घालण्या सारखे आहे,असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हणून आमदार संजय गायकवाड यांना टोला लगावला आहे.