बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी ठाम उत्तर देत फटकारले आहे. “जब तक जिंदा हूं, काँग्रेस का परिंदा हूं,” असे सानंदा यांनी ठामपणे मागील काळात सांगितले. एकनाथ शिंदे माझे जुने मित्र आहेत, आम्ही पूर्वी एकत्र काम केले आहे, पण याचा अर्थ पक्षांतर नव्हे, असेही त्यांनी स्पष्ट केले.आ. संजय गायकवाड यांच्या फार्महाऊसवर सानंदा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी खासदार तथा केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाडही उपस्थित होते. सानंदा यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असले तरी सानंदा यांनी स्पष्ट शब्दांत कोणताही प्रवेश नाकारला.मात्र राजकारणात काहीही होऊ शकते त्यामुळे त्यांच्या एका भेटीने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, चर्चांना नवे फोडले गेले आहे.
- Hellobuldana