मलकापूर (हॅलो बुलडाणा – करण झनके) दि26/05/2024 रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे समर्पण लोन येथे अंगावर भीत पडल्यामुळे मोजे मंगल गेट मारुती मंदिर जवळ मलकापूर येथील विशाल प्रल्हाद चोपडे मरण पावल्यामुळे नैसर्गिक आपत्ती अंतर्गत तहसीलदार मलकापूर यांच्याकडून रू 400000(अक्षरी_चार लाख रुपये फक्त) मूत व्यक्तीच्या पत्नी, शिला विशाल चोपडे राहणार मंगल गेट मारुती मंदिराजवळ मलकापूर तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा यांना दिनांक 26/06/2024 रोजी तहसील कार्यालय मलकापूर येथे चेक देण्यात आला त्यावेळी श्री एस एस उगले तहसीलदार साहेब श्री देवेंद्र कुऱ्हे निवासी नायब तहसीलदार साहेब श्री जी यु खुळे नायक नाझर साहेब श्री धीरज जाधव तलाठी साहेब व ओम शांती समितीचे सचिन भाऊ भंसाली हनुमान सेनेचे अमोल टप, वीरेंद्र कासे प्रहार संघटनेचे अजय भाऊ टप शालिग्राम भाऊ पाटील दिलीप भाऊ पाटील बळीराम बावस्कर उपस्थित होते
- Hellobuldana