spot_img
spot_img

💥ACCIDENT! निंबी फाट्याजवळ दोन दुचाकींची जोरदार धडक, दुर्घटनेत तीन गंभीर!

माटरगाव (हॅलो बुलडाणा) निंबी फाटा येथे जलंब-माटरगाव रोडवर दोन मोटरसायकलमध्ये अमोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. काल रात्री 10 च्या सुमारास या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मच्छिंद्र खेड येथील संजू भारंबे आणि भागवत भारंबे यांना गंभीर दुखापत झाली असून पहुर्जीरा येथील कृषी केंद्र चालवणारे बेलोकार यांचा यात समावेश आहे.

अपघात इतका भयंकर होता की मोटरसायकल पूर्णपणे चिरडल्या गेल्या आहेत. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की दोन्ही मोटरसायकल अत्यंत वेगाने येत होत्या, ज्यामुळे धडक टाळता आली नाही.जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!