बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ना.अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आलाय. बुलढाण्यातील महिला जिल्हाध्यक्ष अनुजा सावळे यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड फुटले.अनुजा सावळे यांनी पक्षाकडून मराठा समाजातील महिलेला अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप करीत राजीनामा दिला आहे. दरम्यान या आरोपाचे रा.काँ जिल्हाध्यक्ष काझी यांनी खंडन केले आहे.
राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष अनुजा सावळे यांनी दीड महिन्यापूर्वीच प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्याकडे राजीनामापत्र सादर केले आहे.परंतु आज त्यांचे हे राजीनामापत्र सोशल मीडियावर झळकले.अनुजासावळे यांनी डॉ. नाझेर काझी यांच्यावर अनेक आरोप केलेत. त्यापैकी मराठा समाजातील सक्षम महिला नेतृत्वाला अपमान देण्याचा मुद्दा त्यांनी मांडला आहे.परंतु या आरोपाचे डॉ. नाझेर काझी यांनी खंडन केले असून, त्यांनी ‘हॅलो बुलढाणा’ ला सांगितले की,माझ्यावर केलेले आरोप धादांत खोटे आहे.अनुजा ताई सावळे यांचे हे राजीनामा नाट्य आहे.कुठल्याही पक्षात महिलांना अपमानास्पद वागणूक देत नसतात.आमचा पक्ष देखील महिलांना व इतर कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक देत नाही.विशेष म्हणजे अनुजा सावळे यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार मनोज कायंदे यांच्या विरोधात काम केले.त्यांच्या माहेर असलेल्या देवखेड या गावात त्या प्रचारासाठी सुद्धा गेल्या नाहीत.त्यांनी असा आरोप करणे योग्य नसल्याचे मत काझी यांनी व्यक्त केले.












