बुलढाणा (हॅलो बुलडाणा) कुणाच्या मनोमनी नसताना वाईचे आमदार मकरंद जाधव यांची बुलढाणा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी वर्णी लागली आणि ते उद्या शनिवार व रविवारी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आहेत.उद्या त्यांचे छत्रपती संभाजी नगर येथून सिंदखेड राजा येथे आगमन होत असून, ते राष्ट्रमाता जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होतील तर रविवारी शासकीय ध्वजारोहण सोहळा त्यांच्या उपस्थित संपन्न होणार आहे.
राज्याचे मदत व पुनर्वसन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील 25 जानेवारी व 26 जानेवारीला जिल्हा दौऱ्यावर आहेत.दरम्यान सिंदखेड राजा येथे आल्यावर जिल्ह्याचे पालक मंत्री आढावा बैठकित जल जीवन मिशनच्या
मुद्द्यावर चर्चा करतील का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मातृतीर्थ सिंदखेड राजा
तालुक्यासाठी अंदाजे 81 कोटी रुपयांची जल जीवन योजनेची कामे सुरु असून अद्याप एकही काम पूर्ण नाही.तालुक्यातील अनेक गावे तहानलेली आहे.परंतु याकडे यंत्रणेचे लक्ष नाही.संबंधित कामाची गुत्तेदार योजना कधी पूर्ण करतील या बद्दल कोणीही विचारणा करायला तयार नाही.कामाची मुद्दत संपूर्ण वर्ष उलटली आहे. पाणीपुरवठा विभागाने याकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही,असे आपल्याला म्हणायचे नाही.परंतु त्यांना संबंधित अधिकाऱ्यांनी जाब विचारला आहे की नाही? हा प्रश्न सर्वांना पडतो आहे. विचारला असेल तर कामे का पूर्ण झाली नाहीत याची माहिती
संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी माध्यमांना दिली आहे का? असाही प्रश्न उपस्थित होतोय.