सिंदखेड राजा (हॅलो बुलडाणा) लोणार येथील दर्शन ज्वेलर्सचे मालक आदित्य संचेती यांना अडवून त्यांच्या जवळील तब्बल 28,31,000 किमतीच्या सोन्या चांदीचे दागिने लुटणाऱ्या बीड येथील 2 संशयित गुन्हेगारांना एलसीबीने अटक केल्याची बातमी ‘हॅलो बुलढाणा’ने आज प्रसारित केली होती.या प्रकरणात आणखी एक अपडेट पुढे आली आहे. या गुन्ह्यातील चोरीचे दागिने सिंदखेड राजा येथे 4 जणांनी विकले आहे.यात एका महिलेचा समावेश असून चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
बीड येथून संशयित आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास चक्र फिरवले असता,स्नेहल ज्वेलर्स सराफा दुकान सिंदखेड राजा येथे चोरीचा गुन्हा उघडकीस आला.सदर प्रकरणी गुन्ह्यात चोरी गेलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची विक्री केल्याची कबुली आरोपीने दिली असून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मच्छिंद्र जालिंदर गवते वय 29 वर्ष रा. बेलोर ता. जि. बीड,गंगाराम धोंडीराम रोकडे वय 36 वर्ष रा. तलवाडा गेवराई जि. बीड,
शिवशंकर महादेव खंदारकर वय 30 वर्ष रा. तांबोळा ता. लोणार, सौ.अनुराधा अण्णा वाळेकर वय 45 वर्ष रा. सिंदखेड राजा अशी आरोपींची नावे आहेत.ही कारवाई एसपी विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.या कारवाई पथकामध्ये एपीआय यशोदा कणसे, पीएसआय प्रताप बजाड, पीएसआय बालाजी सानप, (सि.राजा),शरद गिरी,पुरुषोत्तम आघाव, गजानन गोराले ,दिपक वायाळ, विक्की इंगळे, मंगेश सनगाळे, भारत जाधव, विकास राऊत,पुजा साळवे,विलास भोसले,हेलगे राजू आडवे, कैलास ठोंबरे, ऋषिकेश खंडेराव यांचा समावेश आहे.