spot_img
spot_img

कुत्र्यांच्या सुळसुळाटापुढे नगरपालिका भिगी बिल्ली!- मिर्झा नगरात कुत्रे पाडताहेत बकऱ्यांचा फडशा

बुलढाणा (हॅलो बुलडाणा- इसरार देशमुख) शहरात पुन्हा पिसाळलेल्या मोकाट भटक्या कुत्र्यांनी हैदोस घालण्यास सुरुवात केली असून दिवस रात्र टोळीने जागोजागी ठाण मांडून नागरिकांना भयभीत केले आहे.कुत्र्यांनी मिर्झा नगर येथे धुमाकूळ घातला असून बकरींवर हल्ला करण्याच्या घटना घडत आहेत. दररोज एक बकरी तरी कुत्र्यांची शिकार होत आहे.

या कुत्र्यांच्या जवळून चालत अथवा दुचाकी वरून जाताना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे.भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी या कुत्र्यांचा बंदोबस्त नगर परिषदेने करावा अशी मागणी केली जात आहे. मात्र या कुत्र्यांपुढे नगरपालिका भीगी बिल्ली बनल्याचे चित्र दिसून येत आहे.शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून मुख्य रहदारीचा रस्ता आणि गल्ली बोळात ही कुत्री टोळी टोळीने वावरत असतात.दिवसा व रात्री अपरात्री एकटा दुकटा येणारा प्रवासी, दुचाकी स्वार यांच्यावर ही कुत्र्यांची टोळी तुटून पडत असते.त्यामुळे अशा कुत्र्यांची टोळी असलेल्या ठिकाणावरून जाता येताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे. परंतु डिजिटल काळात कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आमच्याकडे उपाय योजना किंवा यंत्रणा नाही असे निराशा जनक उत्तर नगरपालिकेकडून मिळत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!