spot_img
spot_img

💥 ACCIDENT! पोखरी फाट्यावर भीषण अपघात: बुलेरो चालकाच्या हलगर्जीपणाचा फटका! – बुलढाणा-खामगाव रस्ता अपघाताचा केंद्रबिंदू: नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) काल संध्याकाळी  पोखरी फाट्याजवळ झालेल्या भीषण रस्ता अपघातात भगवान महादेव गायकवाड (राहणार वरवंड) यांचा जागीच मृत्यू झाला. टीव्हीएस रायडर मोटारसायकलवरून बुलढाण्याकडे जात असताना, भरधाव बोलेरो पिकअप (एमएच 28 DD 0651) ने त्यांना उडवले. ही दुर्दैवी घटना मोरे पेट्रोल पंप आणि सेंट जोसेफ शाळेदरम्यान घडली.

पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 4/2025 अंतर्गत कलम 281, 106 (1) व मोटर वाहन कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी दीपक बर्डे यांनी माहिती दिली असून, अपघातानंतर बोलेरो पिकअप चालक फरार झाला आहे.

बुलढाणा-खामगाव मार्गावरील हा रस्ता नागरिकांसाठी जीवघेणा ठरला आहे. “खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा?” हा प्रश्न स्थानिकांच्या तोंडी असून, खराब रस्त्यांमुळे अपघातांची संख्या वाढत आहे. अनेक तक्रारी करूनही प्रशासन ढिम्म आहे. वरवंड आणि आजूबाजूच्या गावांतील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, त्यांनी या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

प्रशासनाला कधी जाग येणार? की अजूनही निष्पाप जीवांचं बळी जात राहणार?

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!