जानेफळ (हॅलो बुलडाणा) अल्पावधीत श्रीमंत होण्याचे स्वप्न बाळगून असणाऱ्या काही लुटारूंनी सोने चांदीचे दागिने चोरण्याचा कट रचला होता.परंतु एलसीबी च्या पथकाने या लुटेरांना जेलची हवा दाखवली!ही कारवाई एसपी विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एलसीबी प्रमुख अशोक लांडे यांचे नेतृत्वातील पथकाने केली.
बुलढाणा जिल्हयातील सोने-चांदीचे दुकान लुटण्याचा कट एलसीबीने उधळला असून, 2आरोपींना अटक केली.आरोपी कडून बंदूक, कोयता, गॅस कटर, चारचाकी वाहन, तीन चोरीच्या मोटारसायकलसह 10,83,770 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यातआला आहे.08गंभीर चोरी,घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करण्यात आली.
पो.स्टे. जानेफळ हद्दीतील ग्राम शेंदला येथील हरिंदरसिंग संतोषसिंग दुधानी हा चोरी-घरफोडी करण्याच्या उद्देशाने अवैध शस्त्र बाळगून, गांव व इतर परिसरात रात्री-बेरात्री फिरत असतो. सदर माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेंदला गावी जावून संशयीत ईसम हरिंदरसिंग संतोषसिंग दुधानी याचा शोध घेवून, त्याचे राहते घराची झडती घेतली असता, त्याचे घरात अवैध शस्त्र आढळून आले.
त्याला पोलिसी खाक्या दाखवला असता त्याचे 4 ते 5 साथीदार यांनी चिखली शहरातील प्रतिष्ठीत सोनाराचे दुकान फोडण्याचा कट रचुन रेखी केली होती त्यासाठी वाशीम जिल्हयातुन बोलेरो गाडीसुध्दा चोरी करुन त्यांनी आणली होती. त्याचा एक साथीदार गणेश जनार्धन मानवतकर रा. शेंदला यास अटक करण्यात आली असुन इतर आरोपींचा शोध सुरु आहे.










