spot_img
spot_img

परभणीच्या शहीद भिम सैनिकाच्या मृत्यूच्या निषेधार्थ देऊळगाव राजा शहर कडकडीत बंद!

देऊळगाव राजा (हॅलो बुलडाणा) परभणीत घडलेल्या घटने नंतर संपूर्ण महाराष्ट्रात आंबेडकर जनता आता रस्त्यावर उतरत असून परभणीत सुरू असलेल्या अन्याय अत्याचार तात्काळ थांबविण्यात यावा. यासाठी ठीक- ठिकाणी आंदोलन मोर्चे निघत आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटबंना केलेल्या व शासनाने राबविलेले कोंबीग ऑपरेशन थांबविण्यात यावे व पोलीस आत्याचारात शहिद भिमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा निषेधार्थ देऊळगाव राजा भिमसैनिकांच्या वतीने बंद चे आवाहान करण्यात आले होते.आज दि. 16 डिसेंबर रोजी भिम सैनिकांच्या वतीने देऊळगाव राजा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. आज सकाळपासून देऊळगाव राजा शहरातील व्यापाऱ्यांचे प्रतिष्ठाने बंद ठेऊन सरकार विरोधात रोष व्यक्त केला. शेकडो भिम सैनिक रस्त्यावर येऊन देऊळगाव राजा तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्याना निवेदन देण्यात आले. या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे की, परभणी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील संविधान प्रतिमेची विटबंना समाज कंटाकाने केली असून हे लोकशाहीसाठी घातक आहे. परंतु सदरहू अटक करण्यात आलेली व्यक्ती ही एकच ताब्यात असून या व्यक्तीच्या पाठीमागे षडयंत्र करणाऱ्या अनेक व्यक्ती आद्यापही मोकाट फिरत आहे. त्या प्रकरणातील मुख्य आरोपिंना देखील योग्य शासन होणे अत्यंत गरजेचे आहे. आंबेडकरी जनता ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानावर प्रेम करणारी जनता आहे. त्यामुळे त्यांच्या भावना दुखवल्या असतांना या प्रकरणातील इतर प्रमुख आरोपीचा शोध न घेता पोलीस प्रशासन कारवाई करून एक प्रकारे दलित नागरिकांवर सूड उगविण्याचं काम केल्या जात आहे. ही अंत्यत अन्यायकारक बाब असून शासनाने राबविले कोंबीगं ऑपरेशन हे आंबेडकरी जनतेच्या जखमेवर मीठ चोळल्या सारखे आहे. पोलिसांच्या कोंबीग ऑपरेशन व एकूण सर्व प्रकरणाची न्यायलयीन चौकशी करावी, कलम 176( अ )सी आर पी सी अन्वये चौकशी करा, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड सह इतर पोलीस अधिकाऱ्यावर कलम 32 अन्वये, अट्रॉसिटी कायद्यानव्ये कलम3(1) आणि 3(2) प्रमाणे गुन्हे दाखल करा. अशी मागणी करण्यात यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहे. या निवेदनावर दिलीप मुळे, सुधीर हिवाळे,गौतम झिने,आकाश कासारे,दिलीप कंचाळ, दिपक इंगळे,रवी पिपंळे,गजानन अंभोरे, उद्धव वाकोडे, यश कासारे, सुनील काळे, आनंद काकडे,संघपाल जाधव यांच्या असंख्य भीमसैनिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!