spot_img
spot_img

💥शॉकींग! अर्ध्यावरती डाव मोडला! – नीट परीक्षा देण्याची अधूरी कहानी!

सिंदखेड राजा (हॅलो बुलडाणा / संतोष जाधव) आज दुपार दरम्यान एसटी आणि आयशर वाहनाच्या झालेल्या अपघातात सिंदखेडराजा येथील बारावीचा विद्यार्थी वैभव अशोक शेरकर हा गतप्राण झाला आहे. तो नीट परीक्षेची तयारी करीत असताना त्याच्यावर काळाने झडप घातली.या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गाव हळहळत आहे.

एम एच 14 बीटी 4276 क्रमांकाची राज्य परिवहन महामंडळाची बस जालना येथून सिंदखेडराजा कडे येत होती.दरम्यान सिंदखेड राजा वरून येणाऱ्या एम एच 13 ए एक्स 2682 आयशरने नाव्हा या ठिकाणी समोरासमोर धडक दिली.हा अपघात एवढा भीषण होता की अपघातामध्ये एसटी बस मधील दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.या अपघातात जवळपास 20 प्रवासी जखमी झालेत. दरम्यान दोन मृतांपैकी सिंदखेडराजा येथील बारावीचा विद्यार्थी वैभव अशोक शेरकर हा दगावला आहे. वैभव हा जालना येथे नीटच्या क्लासेस साठी सिंदखेड राजा येथून दररोज ये जा करीत होता.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!