बुलढाणा (हॅलो बुलडाणा) उद्या 14 डिसेंबर नव्या फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून 35 जण मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. तसेच यंदाचा शपथविधी नागपुरात होणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील आमदार डॉ. संजय कुटे यांना वैद्यकीय शिक्षण विभाग व आरोग्य खाते मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या 5 डिसेंबरला शपथविधी पार पडला. या शपथविधीला आठ दिवस उलटून गेले तरी अद्याप मंत्रिमंडळ, खातेवाटप झालेले नाही. अशातच मंत्रिमंडळाच्या शपथविधीबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उद्या (14 डिसेंबर) नव्या फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून 35 जण मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. तसेच यंदाचा शपथविधी नागपुरात होणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.बुलढाणा जिल्ह्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पर्सनल सचिव विद्याधर महाले यांच्या पत्नी भाजपाच्या आमदार श्वेता महाले दुसऱ्यांदा निवडून आल्याने मंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते म्हणून सक्रिय असलेले आमदार चैनसुख संचेती हे देखील या शर्यतीत पुढे आहेत.शिवाय भाजपाचे आकाश फुंडकर यांचे देखील नाव शर्यतीत आहे.परंतु डॉ.आमदार संजय कुटे यांची जेष्ठता पाहून त्यांना यंदा वैद्यकीय शिक्षण विभाग आरोग्य खाते मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.असे असले तरी प्रत्यक्षात यंदाच्या मंत्रिमंडळात कुणा-कुणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.