बिबी (हॅलो बुलडाणा) लोणार तालुक्यातील बीबी पोलीस स्टेशन हद्दीतील एका घराला काल सांयकाळी भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली असून, पंधरा क्विंटल सोयाबीन,तूर,मुंग, उडीद व रोख रक्कम खाक झाली आहे. त्यामुळे मतिमंद मुलांसह कुटुंब उघड्यावर पडल्याने या कुटुंबाला मदतीची गरज आहे.
बुधवारी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान शेतकरी किसन दासू चव्हाण रा. गोवर्धन नगर यांच्या घराला अचानक आग लागली.या आधीच्या भक्षस्थानी 15 क्विंटल सोयाबीन अंदाजे किंमत रुपये 60-000₹ गहू – तुरीची डाळ – उडदाची डाळ -मुगाची डाळ – नगदी रोक रक्कम 70-000 ₹ घरगुती सर्व साहित्य भस्म सात झाले आहे.या घटनेमुळे किसन चव्हाण या शेतकऱ्याचे पूर्ण कुटुंब हे उघड्यावर पडले. त्यांना दोन मुले असून दोन्ही मुले मतिमंद आहेत. त्यांना लागूनच असलेल्या त्यांचे भाऊ रघुनाथ दासू चव्हाण यांचे सुद्धा घरगुती साहित्य जळून आगी मध्ये खाक झाले आहे.दरम्यान गावकऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली आहे. पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाच्या वतीने पंचनामा करून वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार आहे.आग आटोक्यात आणण्यासाठी लोणार वरून अग्निशमन दलाच्या गाडीला सुद्धा पाचरण करण्यात आले होते.त्यांनी सुद्धा पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली. पुढील तपास बिबी पोलीस करीत आहेत.










