बुलढाणा (हॅलो बुलडाणा) नवनिर्वाचित आमदार श्वेताताई महाले यांनी केलेली विकास कामे विरोधकांना दिसतात परंतु मायबाप मतदारांना का दिसत नाहीत?असा सवाल आता उपस्थित झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अखेर नरुभाऊ खेडेकर खरं बोलले पण…? ते म्हणाले की, विकासकन्या आ. श्वेताताई महाले पाटील यांनी चिखली मतदारसंघाला आपले कुटुंब समजून येथल्या प्रत्येक गावातील प्रत्येकाच्या समस्या सोडवण्याचा आणि जात, धर्म, पक्ष भेद न करता विकासकामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. या प्रयत्नांची दखल प्रत्यक्ष विरोधकांनी घेतली. शिवसेना उबाठाचे नेते, संपर्क प्रमुख प्रा. नरुभाऊ खेडेकर यांनीच याची जाहीर कबुली नुकतीच मविआच्या एका बैठकीत दिली आहे. खेद या गोष्टींचा वाटतो की, श्वेताताईंनी केलेली विकासकामे विरोधकांना दिसतात परंतु, मायबाप मतदारांना का दिसत नाहीत ? श्वेताताईंनी लोकप्रतिनिधींनी म्हणून आपले कर्तव्य बजावले मात्र, कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधीला मतदानातून भरभरून पाठिंबा देण्याचे कर्तव्य पार पाडण्यात मतदार राजाने हात आखडता घेतल्याचे खेडेकर म्हणाले.