बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आज मतमोजणीच्या दिवशी सुरुवातीपासून आघाडीवर राहिलेले शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड या वाघाने प्रतिस्पर्धी उमेदवार महाविकास आघाडीच्या जयश्रीताई शेळके यांना मात देत मशाल धनुष्याने विझवली! गायकवाड यांनी तब्बल 1473 मताच्या फरकाने विजयी झाले आहेत. तर त्यांच्या पाठोपाठ जयश्री ताई शेळके यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवून त्यांना जोरदार टक्कर दिली आहे.दरम्यान संजय गायकवाड यांचा बुलढाणा मतदारसंघात निसटता विजय झाला असला तरी कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे. बुलढाण्यात मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार जल्लोष सुरू केलाय!
- Hellobuldana