बुलढाणा (हॅलो बुलडाणा) हजारो शेतकरी व शेतमजुरांची चळवळ उभारणाऱ्या डॉ. ऋतूजा चव्हाण यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आज 16 नोव्हेंबर रोजी डोणगाव येथे वंचितचे फायर ब्रँड नेते सुजात दादा आंबेडकर
यांची जाहीर सभा होत आहे.ही जंगी सभा सायंकाळी 4 ते रात्री 10 पर्यंत जिल्हा परिषद कन्या शाळेसमोर, जुनी गुजरी डोणगाव येथे होऊ घातली आहे.डॉ. ऋतूजा चव्हाण यांच्या आश्वासक चेहऱ्याला शेतकऱ्यांसह सर्व क्षेत्रातील मतदारांची पसंती दिसून येत आहे.
डॉ. ऋतूजा चव्हाण आमचा आंदोलनात्मक पवित्रा सर्वश्रूत आहे.त्यांनी शेतकरी चळवळीसाठी भरीव योगदान आहे. त्यांनी विधानसभा निवडणुक प्रचारात आघाडी घेतली असून, आज युवकांचे फायर ब्रँड नेते सुजात दादा आंबेडकर यांची जाहीर सभा एकण्यासाठी जनतेची उत्सूकता शिगेला लागली आहे.सभेला हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.