spot_img
spot_img

💥पॉलिटिक्स! जुन्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी कट्टीबध्द – राहूल बोंद्रे

चिखली (हॅलो बुलडाणा) मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पेन्शन योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कट्टीबध्द असल्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहूल बोंद्रे यांनी सांगितले. पेन्शन हा कर्मचाऱ्यांच्या बाबतीतला अत्यंत महत्वाचा मुद्दा असून सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शन साठी लढा देत आहेत.

हिमाचल प्रदेश मध्ये काँग्रेसचे सरकार आल्यानंतर तिथे जुनी पेन्शन योजना लामू करण्यात आली. राहुल गांधी यांनी सुद्धा जिथे जिथे काँग्रेसचे सरकार येईल तिचे तिथे जुनी पेन्शन लागू करण्यात येईल असा शब्द दिला आहे. हे ही या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

पेन्शन म्हणजे म्हातारपणाची काठी आहे ही काठी पुन्हा मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे असा शब्द राहुल बोंद्रे यांनी दिला आहे .सरकारी कर्मचारी आपल्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे सरकारची सेवा करण्यासाठी घालवतात. त्याअनुषंगाने सेवानिवृत्तीनंतर त्या कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याची जबाबदारी ही सरकारची असते. मात्र महायुती सरकार ही जबाबदारी झटकत असल्याचा आरोप राहुल बोंद्रे यांनी केला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!