spot_img
spot_img

‘जळक्या’ वृत्तीचे ‘आगलावे’ मोकाटच! -तब्बल 17 एकरातील सोयाबीनच्या सूड्या पेटविल्या! -सुमारे 15 लाख रुपयांच्या नुकसानीचा अंदाज! -ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या नशिबी अंधार !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) रात्रंदिवस रक्ताचे पाणी करून पिकवलेले सोयाबीन पेटवून देण्याच्या जळक्या वृत्तीमुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या नशिबी अंधार दाटलाय. चिखली तालुक्यातील किन्होळा येथे 25 ऑक्टोंबरला 4 शेतकऱ्यांच्या 17 एकर शेतातील सोंगलेल्या सोयाबीनच्या गंजीला अज्ञातांनी आग लावून सुड्या खाक केल्या.तर याच महिन्यात माळवी येथे 3 एकर शेतातील सोयाबीनच्या गंजीला पेटवून दिले होते.चिखली तालुक्यातील किन्होळा येथे

एकनाथ नामदेव बाहेकर यांच्या 5 एकर शेतातील तर संतोष नारायण बाहेकर यांच्या 4 एकर व दिनकर बंडु बाहेकर यांच्या 6 एकर तसेच माणिकराव गंगाराम बाहेकर 2.5 एकर शेतातील सोयाबीनच्या सूड्या जाळल्याने
तब्बल 15 लाखांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. घटनेचा पंचनामा झाला असून पोलिसांनी श्वानपथक व ठसे तज्ञाला पाचारण केले होते.माळवीर येथील दिलीप तेजराव आडवे यांच्या 5 एकर शेतीतील सोयाबीनचा देखील याच महिन्यात अज्ञात व्यक्तीने कोळसा केला होता. आधीच पावसाने शेतकऱ्यांच्या अधिकाअधिक सोयाबीनची नासाडी केल्याने त्यांच्यावर अस्मानी संकट कोसळलेले आहे.शेतमालाला भाव नसल्याने सुलतानी संकटही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.अशात
सोयाबीन सुडी पेटवून बदला काढण्याची जळकी वृत्ती वाढली असून भर दिवाळीत शेतकऱ्यांच्या नशिबात अंधार पसरला असून अशा आगलाव्यांना पकडण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेपुढे उभे ठाकले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!