spot_img
spot_img

💥पॉलिटिक्स ! ‘लोकगंगेला’ आला पूर..आता विकासगंगा नाही दूर! -हजारोंच्या साक्षीने जयश्री शेळकेंचा नामांकन अर्ज दाखल! -निवडणूक जनतेनेच हातात घेतल्याची प्रचिती !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी आज हजारो समर्थकांच्या साक्षीने उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या लोकगंगेच्या पुरामुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघात निश्चितच जयश्रीताईंच्या रूपाने विकासाची गंगा अवतरणार असल्याचे आशादायी चित्र यावेळी दिसून आले आहे.

उमेदवारी अर्ज भरताना जयश्री ताई शेळके यांनी ही निवडणूक जनतेनेच हातात घेतल्याची प्रचिती येत असून आमदारकीची संधी दिल्यास आपल्या सेवेसाठी तत्पर राहून परिवर्तन घडविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास जयश्रीताई यांनी व्यक्त केला आहे.दरम्यान टिळक नाट्य गृह परिसरातजाहीर सभेसाठी प्रचंड गर्दी उसळली असून सभेला काँग्रेसचे महासचिव खासदार मुकुल वासनिक व शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे संबोधित करणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!