spot_img
spot_img

💥पॉलिटिक्स ! सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील विंचनकर यांची अपक्ष उडी ! -म्हणाले.. सर्वांगीण विकासासाठी अपक्ष निवडणूक लढवणार!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मलकापूर विधानसभा मतदारसंघात सध्या निवडणुकीचे वातावरण कमालीचे तापले असून भाजपा व काँग्रेसने देखील येथे आपला उमेदवार अद्याप घोषित केला नाही.परंतु सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील विंचनकर अपक्ष मैदानात उतरले असून ते उद्या नामांकन अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मलकापूर विधानसभा मतदारसंघ सध्या चर्चेत आला आहे.येथे काँग्रेसने व भाजपाने उमेदवारी वेटिंग वर ठेवली आहे. भाजपाकडून चैनसुख संचेती आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमा तायडे दावेदारी सांगत आहेत. दरम्यान सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील विंचनकर अपक्ष म्हणून मैदानात उतरले.सर्वांगीण विकास घडवून आणायचा असेल तर पक्षीय भिंती बाजूला ठेवावी लागेल,मी कुण्या पक्षाकडे उमेदवारीसाठी गेलेले नाही परंतु चार-पाच पक्षांकडून मला चर्चे करिता बोलवणे आले होते परंतु स्वतंत्र निवडणूक लढवायची असल्याने आणि जनतेला सुद्धा निष्पक्ष उमेदवार हवा असल्याने मी अपक्ष म्हणून उद्या नामांकन अर्ज दाखल करीत असल्याचे ते म्हणाले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!