बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून जयश्रीताई शेळके, शिवसेना (उबाठा) यांना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी ए बी फॉर्म दिलाय.त्या मुंबईवरून आज बुलढाण्यात पोहचल्या असता,चिखली रोडवरील राजर्षी शाहू बँकेसमोर त्यांच्या समर्थकांनी एकच गर्दी केली.ढोल ताशांच्या व फटाक्यांच्या आतिषबाजी त्यांच्या उबाठा शिवसेना उमेदवारीचे स्वागत करण्यात येत आहे. ताईंच्या ‘हाती’ ‘मशाल!’ आल्यामुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघात आनंदाची लाट उसळली. या उमेदवारीसाठी मुंबईत ठाणे मांडून बसलेल्यांनी देखील त्यांना समर्थन दिल्याचे समजत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकी करिता ताईंची तिकीट फायनल असल्याची माहिती त्यांच्या समर्थकांना मिळाल्याने प्रतीक्षेत असलेल्या आज त्यांच्या चाहत्यांनी ताईंच्या जनसंपर्क कार्यालयासमोर त्यांना शुभेच्छा, अभिनंदन व आशीर्वाद देण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.