बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अलीकडे सत्तेसाठी उमेदवारांची निवड करताना तो उमेदवार निवडून येण्याची शक्यता किती व आर्थिक स्थिती कशी आहे? याला प्राधान्य देण्यास प्रारंभ झाला. इथेच निष्ठावंतांकडे दुर्लक्ष होतेय.हे दुर्लक्षसुद्धा निष्ठावंतांनी मान्य केले. प्रत्येक निष्ठावंत हा लोकप्रतिनिधी होण्यासाठी इच्छूक नव्हता व नाही.परंतु उच्च पदस्थ व भंपकपणा करणाऱ्या सध्याचे इच्छुक उमेदवारांची गर्दी पाहता खऱ्या निष्ठावंतांना उमेदवारी देण्याची मागणी 25 ते 30 वर्षापासून स्वतंत्र काम करणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिक डॉ. संतोष तायडे यांनी ‘हॅलो बुलढाणा’ शी बोलताना केली आहे.
लोणार मेहकर विधानसभा मतदारसंघात निष्ठावंत शिवसैनिक डॉ. संतोष तायडे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.ते खामगाव येथील मुळगाव चे असून त्यांनी मुंबईत आणि खामगावात देखील 25 ते 30 वर्षापासून निष्ठा पूर्वक शिवसेनेचे काम केले आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत निष्ठावंत सर्वत्र ताठ मानेने उभे आहेत.अलीकडे मात्र निष्ठावंतांना मान-सन्मान कमी होत असल्याचे दुर्दैव आहे. निष्ठावंतांनी आजपर्यंत संघटन मजबूत केले आहे.
निष्ठावंत म्हणजे असंतुष्ट नाहीत, उलट आमची तळमळ पक्षासाठी व राष्ट्रहितासाठी आहे. याचे भान सर्वांनी ठेवावे असेही डॉ. संतोष तायडे म्हणाले .