बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मेहकर विधानसभा मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या डॉ संजय रायमुलकर यांनी इच्छुक उमेदवार शासकीय स्वेच्छा निवृत्ती घेतलेले सिद्धार्थ खरात यांच्यावर घणाघाती आरोप केला आहे.खरात यांनी शासकीय कार्यकाळात खोट्या स्वाक्षरीने माया गोळा केली असून, ते बोगसगिरीत क्रमांक एक वर असल्याचे आ. रायमुलकर म्हणाले.
विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.मंत्रालय स्तरावर उपसचिव असलेल्या सिद्धार्थ खरात यांनी विद्यमान आमदार संजय रायमुलकर यांच्यावर विकास कामा संदर्भात आरोप केला होता या आरोपाला उत्तर देताना रायमुलकर यांनी टीकास्त्र डागले आहे.सिद्धार्थ खरात यांना कसली हवा आहे.त्यांचे प्रमोशन देखील झाले असते.परंतु पैशाची हा सोडल्याने खरात उलट सुलट आरोप करीत आहेत.ते कुणाच्या सुखात किंवा दुःखात अद्याप दिसले नाहीत. तत्पूर्वी त्यांनी शेतकरी प्रश्नांवर मोर्चा काढला. परंतु शेतकऱ्यांच्या समस्या सरकारने अर्धी अधिक सॉल केल्या आहेत. विशेष म्हणजे या मोर्चात काहीच गर्दी नव्हती. विधानसभा निवडणूक या तोंडावर वेळेवर यायचा आणि श्रेय घेण्याचा प्रयत्न करायचा हे मतदारांना समजतेय ते दूध खुळे नाहीत.राणे साहेबांची बोगस सही मारणारा कोण होता ?त्याच्यातून करोडो रुपये घेणारा कोण ? दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेऊन करोडो रुपयांचा चुना लावणारा कोण होता हे सर्वश्रुत असल्याचे रायमुलकर म्हणाले.