बुलढाणा (हॅलो बुलढाणा) विधानसभा निवडणुकीला मोजकेच दिवस शिल्लक राहिल्याने विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथा पालथ दिसून येत आहे.तत्पूर्वीच मनसेचे विठ्ठल लोखंडकार व माजी आमदार धृपदराव सावळे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर आता बुलढाणा शहरातील शिंदे गटातील व इतर काही पक्षातील नगरसेवक काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती ‘हॅलो बुलढाणा’ ला प्राप्त झाली आहे.
विधानसभा निवडणुक जसजशी जवळ येत आहेत तस तशी पक्षांतराची गतिविधी वाढत आहे.विविध पक्षातील इच्छुक उमेदवार ताकतीने कामाला लागले असून कुणाकडून तिकीट मिळते याची चाचपणी करीत आहे. मनसेचे विठ्ठल लोखंडकार व माजी आमदार धृपदराव सावळे यांनी तत्पूर्वीच काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.दरम्यान बुलढाणा नगर परिषदेतील 4 नगरसेवक लवकरच काँग्रेसवासी होणार असून दिल्ली येथील कार्यालयात त्यांचा जाहीर प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.














