मेहकर (हॅलो बुलढाणा) मेहकर तालुक्यातील खंडाळा येथील तलावामध्ये एक अनोळखी प्रेत तरंगताना मिळून आल्याची घटना समोर आली आहे.याप्रकरणी पोलीस स्टेशन मेहकर येथे अनोळखी मृतक क्रमांक 44/2024 कलम 194 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 अन्वये मर्ग दाखल करण्यात आला आहे. सदर मृतक अनोळखी पुरुष असून वय अंदाजे 30 ते 35 वर्षे, उंची पाच फूट,रंग सावळा व उजव्या हातावर कोपराजवळ दिल चिन्हांमध्ये काहीतरी नाव गोंधलेले दिसत आहे.







Hellobuldana





