spot_img
spot_img

संगम तलावातील पाण्याचे सिमोल्लंघन ! -आलेला निधी पण बुडाला काय ?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ब्रिटिश कालीन यंत्रणेनी संगम तलावाच्या बांधलेल्या भिंतींची लक्ष्मणरेखा आताच्या नगरपालिकेच्या दुर्लक्षाने प्रवाहित पाण्याने ओलांडल्याने संगम तलाव धोक्यात आला आहे.दरम्यान अनेक वेळा आलेला निधी बुडाला की काय ? असा प्रश्न उपस्थित झालाय.

बुलढाण्यात जोरदार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागलेत.दरम्यान ब्रिटिशकालीन संगम तलावाची भिंत खचली व पाणी बाहेर पडू लागल्याने भीती बळावली आहे.
नगरपालिकेच्या दुर्लक्षतेमुळे शहरातील तार तलाव,लेंडी तलाव केंव्हाचेच नामशेष झालेत. त्यातच इंग्रजकाळात शहराला पाणी पुरवठा करणार्‍या संगम तलावाला पाणपर्णी वनस्पतीने विळखा घातलाय. या तलावात दिवसागणिक पाणपर्णीचे मोठमोठे बेटे तयार होत आहेत. या पाणपर्णीचे लवकर उच्चाटन न केल्यास भविष्यात संगम तलाव धोक्यात येवू शकतो. इंग्रजांनी १८६७ साली थंड हवेच्या बुलडाणा शहराला जिल्ह्याचा दर्जा प्राप्त करून दिला होता. त्यावेळी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी शहराच्या चारही बाजुला तलावाची निर्मिती करण्यात आली होती. त्यामध्ये संगम तलाव, तार तलाव, लेंडी तलाव व सरकारी तलाव यांचा समावेश आहे. कितीतरी वर्ष शहराला संगम तलावातून पाणी पुरवठा करण्यात येत होता. तर लेंडी तलाव व तार तलाव यांचा वापरासाठी व कपडे धुण्यासाठी वापर करण्यात येत होता. परंतु स्वातंत्र्यानंतर या चारही तलावाला अवकळा प्राप्त झाली. नगरपालीकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे तार तलाव व लेंडी तलाव केंव्हाचेच नामशेष झाले आहेत. तर आता इंग्रजकालीन पाणी पुरवठा करणार्‍या संगम तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.संगम तलावाच्या सौंदर्यकरणासाठी आमदार संजय गायकवाड यांनी निधी खेचून आणला होता. परंतु आज या तलावाची भिंत खचल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!