बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरासह जिल्ह्यात जुगाराचा बाजार मांडलेला असून आज एलसीबीच्या पथकाने अंढेरा व सिंदखेडराजा पोलीस ठाणे हद्दीत 6 आरोपींवर गुन्हा दाखल करत मुद्देमाल जप्तीची कारवाई केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या आदेशाने 15 सप्टेंबर रोजी अंढेरा व सिंदखेडराजा पोलीस ठाणे हद्दीत दारू व वरली मटका प्रकरणी कारवाई करीत 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
अंढेरा हद्दीत दारूबंदी कायद्यान्वये दोन आरोपींकडून 7700 रुपये तसेच जुगार प्रकरणातील दोन गुन्हे दाखल करून दोन आरोपींकडून वरली मटक्याच्या साहित्यासह 2655 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच सिंदखेडराजा हद्दीत एक दारूबंदी कायद्यान्वये एका आरोपीकडून 2540 रुपये तर जुगार प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करून जुगार साहित्यासह 1330 असा एकूण 3870 रुपयांचा मुद्देमाल जप्तीची कारवाई करण्यात आली. ही कारवाई एलसीबी चे हेड कॉन्स्टेबल दिगंबर कपाटे,एलएचसी वनिता शिंगणे, पीसी दीपक वायाळ,पीसी मंगेश सनगाळे यांनी केली.










