spot_img
spot_img

अखेर पोपट पिंजऱ्यात ! -तब्बल 22 वर्षापासून होता फरार! -एलसीबीने ठाणे येथे ठोकल्या बेड्या!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) तब्बल 22 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला ठाणे येथून मोठ्या शिताफीने बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. बाळू बाबुराव काळे ऊर्फ पोपट भाऊसाहेब खोले रा. राक्षसभुवन ता. पाटोदा जि. बीड असे आरोपीचे नाव आहे.

मा. अतिरिक्त सत्र न्यायालय खामगांव यांनी सदर आरोपीला खून प्रकरणात शिक्षा ठोठावली होती. सन 2022 पासून तो फरार होता.त्याच्या विरुध्द पो.स्टे. हिवरखेड येथे गुरनं. 62/1995 कलम 302, 201 भादंवि
प्रमाणे गुन्हा नोंद आहे. गुन्ह्याचा तपास पुर्ण होऊन आरोपी विरुध्द मा. अतिरीक्त सत्र न्यायालय, खामगांव येथे दोषारोप पत्र न्यायार्थ
दाखल करण्यात आले होते. मा. अतिरीक्त सत्र न्यायालय, खामगांव यांनी दि.1ऑगस्ट 2002 रोजी आरोपी यास दोषी ठरवून शिक्षा ठोठावली होती. तदनंतर आरोपी हा मा. उच्च न्यायालय, बॉम्बे खंडपीठ नागपूर येथे अपीलमध्ये गेला आणि तेंव्हा पासून फरार झाला होता. वरिष्ठ न्यायालय यांनी त्याचे अपील फेटाळल्यावर तो न्यायालयामध्ये हजर न होता, स्वतःचे अस्तित्व लपवून वेगवेगळ्या ठिकाणी चोरून लपून राहत होता. मा. सत्र न्यायालय, खामगांव यांनी सदर सिध्ददोषी आरोपी बाळू बाबुराव काळे ऊर्फ पोपट भाऊसाहेब खोले रा. राक्षसभुवन ता. पाटोदा जि. बीड याचे अटकेसाठी अटक वॉरंट काढून आरोपीस पकडण्यासाठी निर्देश दिले होते. या प्रकरणी विश्व पानसरे पोलीस अधीक्षक, बुलढाणा, अशोक थोरात अपोअ. खामगांव,बी. बी.
महामुनी अपोअ. बुलढाणा यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली यांनी सिध्ददोषी आरोपी यास अटक करण्यासाठी पोनि.अशोक एन. लांडे स्थागुशा बुलढाणा यांचे नेतृत्वात
स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली. यातील आरोपी यास पोलीस त्याचा शोध घेत असल्याची कुणकुण
लागल्याने, तो त्याचे राहते घर सोडून मुक्कामाचे ठिकाण बदलत होता. त्यामुळे शोध पथकास त्याला पकडण्यास अडचणी येत
होत्या. दरम्यान
गोपनीय खबरी बातमीदाराने सदर आरोपी हा मुंबई येथे वास्तव्यास असल्याचे सांगीतले.त्यामुळे सदर आरोपीच्या शोधकामी
पोउपनि प्रताप बाजड, पोहेकॉ. दिनेश बकाले, पोना, विजय वारुळे, चा. पोहेकॉ समाधान टेकाळे स्थागुशा बुलढाणाचे पथक ठाणे जिल्ह्यातील डोंगरी झोपडपट्टी परिसरात पोहचले. परंतु सदर ठिकाणची झोपडपट्टी ही सन 2017 मध्ये पडली असल्याचे दिसले.
त्यामुळे डोंगरी झोपडपट्टी परिसरातील जुन्या वास्तव्यातील लोकांना विचारपूस केल्यावर सदर आरोपी हा सन 2017मध्ये परिसरात
ऑटोरिक्शा चालवित असल्याचे समजले. सदर प्रकरणी, तांत्रिक विष्लेषण विभाग बुलढाणा यांची मदत घेवून सन 2017 वर्षी
आरोपीच्या संपर्कात असलेल्या लोकांची माहिती घेवून, त्यांना भेटून आरोपीचा ठावठिकाणा प्राप्त करण्यात आला. एकंदरीत, 22
वर्षामध्ये आरोपीची चेहरे पट्टी व राहणीमानामध्ये बदल झाला असेल असे गृहीत धरून, पो.स्टे. काशीगांव परिसरात, पो.स्टे.
काशीगांव यांची मदत घेवून ऑटोरिक्षा चालत असलेल्या ठिकाणी यातील आरोपीचा जुना फोटो दाखवून ओळख पटविण्यात आली.
प्रकरणी, दि. 14 सप्टेंबर रोजी पो.स्टे. काशीगांव (मिरा भाईंदर आयुक्तालय) परिसरात सिध्ददोषी फरारी आरोपी बाळू बाबुराव
काळे ऊर्फ पोपट भाऊसाहेब खोले रा. राक्षसभुवन ता. पाटोदा जि. बीड येथे आढळून आल्याने त्याला अटक करण्यात आली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!