spot_img
spot_img

ब्रेकिंग! ‘गुलालबंदी’चा जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल! ‘गूलाला’ वरील कारवाईने विक्रेते ‘लालेलाल!’ -साखरखेर्डात 1080 किलो गुलाल हस्तगत!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीत रासायनिक गुलालाची उधळण,विक्री व साठवणुकीवर जिल्हाधिकाऱ्यांनी तत्पूर्वीच कायमस्वरूपी बंदीचा आदेश जारी गेला होता. दरम्यान साखरखेर्डा येथे आज 14 सप्टेंबर रोजी रासायनिक गुलाल विक्रीस ठेवणाऱ्या व्यापाऱ्यावर पोलीस,महसूल विभाग व ग्रामपंचायतच्या वतीने संयुक्त कारवाईचा बडगा उगारण्यात येऊन 9 हजार रुपये किमतीचा 1080 किलो गुलाल हस्तगत करून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

साखरखेर्डा येथे पोलीस,महसूल विभाग व ग्रामपंचायतच्या वतीने संयुक्तपणे किरकोळ व घाऊक व्यापाऱ्यांकडे रासायनिक गुलालाची साठवणूक किंवा विक्री होत आहे का?याचा शोध घेण्यात आला.तत्पूर्वी साखरखेर्डा पोलिसांनी सर्व किराणा दुकान तसेच गुलाल घाउक व किरकोळ विक्रेता यांना भारतीय नागरीक सुरक्षा संहीता कलम १८ प्रमाणे नोटीस बजावली होती. दरम्यान
आज रोजी दुपारी 12 वाजता साखरखेर्डा पोलीस,महसुल विभागाचे अधीकारी तसेच ग्रामविकास अधीकारी चनखोरे तसेच मंडळ अधीकारी रघुनाथ सोळंके , तलाठी लखण राजपुत,कोतवाल शुभम,अशोक खरात व वैभव सुधाकर तुपकर यांनी पंचासमक्ष आशीष किराणा स्टोअर्स,संकेत वाईनवार जवळील मलकापूर पांग्रा रोडवरील आशिष अरविंद बेदाडे यांच्या किराणा दुकानाजवळील गोडाऊन मध्ये
19 बॅग प्रत्येकी 50 किलो वजनाच्या प्रती बॅगमध्ये लहान 10 किलोच्या 5 बॅग असलेल्या तसेच 10 किलोच्या 13 बॅग मिळून आल्या. त्या बॅगवर रॉकसॉल्टं असे लिहलेले असुन सदर गुलाल हातावर घेवुन बोटास पाणी लावुन चोळुन पाहीले असता त्या गुलाला मध्ये रासायणीक रंग व बारीक रांगोळी सारखी चुरी आढळुन आली. त्यामुळे गुलाल जप्त करून साखरखेर्डा पोलीस ठाण्यात अपराध क्रं 233/2024 बी एन एस कायदा कलम 223 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे,अपर पोलीस अधीक्षक बि.बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधीकारी प्रदीप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन साखरखेर्डा येथील ठाणेदार सपोनि गजानन दिगांबर करेवाड, सपोनि मिलींद पारडकर नेम नियंत्रण कक्ष बुलढाणा. पो उप नि ए.डी थोपटे, शुभम वरदाडे
,पोहेकॉ नितीन प्र. राजे जाधव पोहेकॉ वाजीराव खरात, चालक पोकों वाघ व चालक पो कों मेहेर पोस्टे साखरखेर्डा कांबळे,ग्राम विकास अधीकारी ज्ञानेश्वर चनखोरे, महसुल स्टॉफ मंडळ अधीकारी साखरखेर्डा रघुनाथ सोळंके तसेच तलाठी लखण राजपुत, कोतवाल शुभम अशोक खरात व वैभव शुभाकर तुपकर यांनी केली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!