बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा,शिर्डी येथे रविवारी (दि.१५) जुनी पेंशन संघटनेचे महाअधिवेशनात जिल्ह्यातील हजारी कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे मुरली टेकाळे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटाना अनेक वर्षापासून जुरी पेंशन साठी मागणीसाठी लढत आहे. संघटनेच्या विविध आंदोलनात लाखो कर्मचारी जुन्या पेंशन साठी असंतोष व्यक्त करीत असताना कोणतेही सरकार असले तरी फक्त आश्वासन देऊन बोळवण करत आहे. राज्यात विधानसभेच्या निवडनुका होणार असून या निवडणुकीत जुनी पेंशन लागू करण्याबाबत राज्यातील विविध पक्षांची भूमिका सर्व कर्मचाच्या समोर व्यक्त करण्यासाठी संघटनेद्वारा अधिवेशन सुट्टीच्या दिवशी म्हणजेच १५ सप्टेंबर राजी घेण्यात आले आहे. त्यामुळे विध्यार्थी ची, सामान्य नागरिकांची गैरसोय होणार नसल्याचे मुरली टेकाळे यांनी सांगितले. शासनाने लागू केलेली UPS .GPS ,NPS योजना कर्मचाऱ्यांना मान्य नाही वेतनातून रक्कम कपात न करता पूर्वीप्रमाणे OPS जुनी पेंशन योजना लागू करावी,एनपीएम, जीपीएस, युपीएस योजना फसवी आहे जुनी पेंशन लागू करावी या मागणी साठी महाधिवेशनात राज्यभरातून लाखो कर्मचारी परिचारीका उपस्थित राहणार आहे अन्य विविध विभागातील कर्मचा-यांनी या अधिवेशनास उपस्थित राहवे, असे आवाहन राज्य संपर्कप्रमुख मुरली टेकाळे व जिल्हाध्यक्ष नंदू सुसर यांनी केली आहे.