spot_img
spot_img

डॉक्टरच्या घरात धाडसी चोरी..! -दागिन्यांसह 75 हजारांचा मुद्देमाल लंपास! -पोलिसांना चोरट्याची आव्हान!

मलकापूर (हॅलो बुलढाणा/करण झनके) वैद्यकीय व्यवसाय करत असलेल्या डॉक्टरांच्या घरात धाडसी चोरी झाल्याची घटना मलकापूर पासून जवळच असलेल्या वाकोडी शिवारातील संग्राम हॉटेल समोरील पूर्वा नगर मध्ये दुपारी घडली. या घटनेत दाग दागिने व रोख रक्कमेसेह एकूण 75 हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला.

प्रणव रामचंद्र चोपडे वय 26 रा. वाकोडी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ते पूर्वा नगर मध्ये आई सह वास्तव्यास आहेत. त्यांचे मलकापुरात डेंटल हॉस्पिटल आहे. नेहमीप्रमाणे रोज ते त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यांना त्यांच्या आईचा फोन आला, त्यांनी सांगितले की मी बँकेच्या कामानिमित्त स्टेट बँक मध्ये आली होती. बँकेचे कामे करून घरी आली असता त्यांना घराचा लॉक तुटलेला दिसला. फिर्यादी यांनी घरी येऊन पाहणी केली असता घरात ठेवलेली रोख रक्कम व दाग दागिने असा एकूण 75000 हजाराचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचे दिसून आले. दिवसाच्या उजेडात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरडे पोलिसांना आव्हान देत असून पोलिसांचा भाग संपला की काय असा प्रश्न चर्चिला जात आहे. याप्रकरणी प्रणव चोपडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!