बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी जिल्हा पोलीस दलाची सूत्रे सांभाळल्यापासून स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईचा सपाटा लावला आहे. काल एका सोनसाखळी चोराला अटक करण्यात आली.
पोलीस सूत्रानुसार,राम उर्फ राज बिरजू भोसले वय 20 वर्ष रा सिंदखेड राजा ह.मु. सार्सी, परभणी असे चोरटेचे नाव आहे.दरम्यान आरोपीकडून मेहकर 2, सिंदखेड राजा- 2 असे एकुण 4 गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्यामार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.अशोक लांडे यांचे आदेशाने चोरी जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करण्यात आला. सिंदखेड राजा येथील गुन्ह्यातील गेला मुद्देमाल 7 ग्रॅम सोन्याची पोत आरोपीकडून जप्त केली आहे.
उघडकीस आलेल्या चार गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
रवि मोरे,राजेंद्र अंभोरे, युवराज राठोड, विजय वारुळे,दीपक वायाळ या एलसीबी पथकाने ही कारवाई केली.










