spot_img
spot_img

आमदार संजय गायकवाड यांनी उपसले आमरण उपोषणाचे अस्त्र! -मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर करणार उपोषण! -सत्तेतील आमदार संजय गायकवाडांवर उपोषणाची वेळ का आली?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मागणीपूर्तीसाठी उपोषण,आंदोलन आणि यात्रा काढण्याचा जोर वाढलाय.अशात सत्ताधारी पक्षाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील आमरण उपोषणाचे अस्त्र हाती घेत, मंत्रालयातील अधिकारी काम करीत नसल्याचा ठपका ठेवून 12 सप्टेंबर रोजी मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.

सत्तेतील आमदार संजय गायकवाड ही उपोषणाची वेळ का आली? तर मुख्यमंत्र्यांनी एका वर्षाआधी बैठक घेतली.या बैठकीत आमदारांच्या कामांचा आदेश काढण्याचे अधिकाऱ्यांना सांगितले.परंतु एक वर्षानंतरही सदर कामाला गती आली नाही.दरम्यान मागील 24 तारखेला पुन्हा बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना पंधरा दिवसात आदेश काढा म्हटले तरीही कामांचे आदेश निघाले नाहीत. राज्यभर फिरायचे…धडपड करायची..लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांचे प्रश्न व इतर समस्या सोडवण्यासाठी मरमर करायची..आणि मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी खुर्ची उबवायची,कामात दिरंगाई करायची ..यामुळे वैतागाने उपोषणाचा निर्णय घेतल्याचे आमदार गायकवाड म्हणाले.जोपर्यंत कामांचा आदेश निघत नाही तोपर्यंत मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरून उतरणार नाही,असा आमरण उपोषणाचा इशारा गायकवाड यांनी मुख्य सचिव सुजाता सवनिक यांना एका पत्रातून दिला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!