चिखली (हॅलो बुलडाणा) नरेंद्र मोदी हे या देशाने पाहिलेले सर्वात खोटारडे पंतप्रधान आहेत. नरेंद्र मोदींनी 2022 पर्यंत सर्वांना घर मिळेल हे वचन सर्व देशवासीयांना दिले होते. शिर्डी येथील सभेत बोलताना। ” सबका खुदका घर होगा, घर मे नल होगा, नल को हर पल जल होगा” अश्या अनेक पुंग्या पंतप्रधानांनी सोडल्या असे माजी आमदार व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे म्हणाले.
हे सरकार “अंबानी,अदानीचे” असून अनिल अंबानीचे 15000 करोड रुपयाचे कर्ज त्वरित माफ केले जाते, परंतु प्रामाणिकपणे काबाडकष्ट करणाऱ्या माझ्या माय बहिणींच्या हक्काच्या घरकुलाचे हप्ते देताना या सरकारला अपंगत्व येते का?असा खडा सवाल राहुलभाऊ बोन्द्रे यांनी विचारला.
जिल्ह्यात चार हजार घरकुले मंजूर झालेली आहेत, तर चाळीस हजार घरकुलांची वेटिंग लिस्ट आहे तर मंजूर झालेल्या चार हजार घरकुलांपैकी फक्त 1300 घरकुलांचे काम झाले आहे, या स्पीडने गेले तर पुढील ४० वर्षातही घरकुले तयार होणार नाहीत, मोदींच्या नावावर उद्या तुमच्या घरापर्यंत मत मागायला जी लोक येतील, त्यांना पहिले आमच्या घरकुलाचं काय झालं ते सांगा? हा प्रश्न विचारा नाहीतर गावातून काढून द्या.!!असे स्पष्ट शब्दात राहुलभाऊ बोन्द्रे यांनी उपस्थितांना आवाहन केले.आज पंचायत समिती कार्यालय चिखली येथे घरकुल वासियांच्या हक्कासाठी काँग्रेस कमिटी मार्फत काढलेल्या मोर्चाचे नेतृत्व करताना माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे बोलत होते.