spot_img
spot_img

बुलढाणा विधानसभा मतदारसंघ राखीव करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे रेटा! – मतदारसंघ राखीव झाल्यास आमदार संजय गायकवाड यांची कोंडी?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) एकीकडे वादग्रस्त वक्तव्यामुळे आम. संजय गायकवाड चर्चेत येत असून, दुसरीकडे विरोधक गायकवाड यांना कोंडीत पकडण्याचा एकही प्रयत्न सोडत नाहीत. दरम्यान बुलढाणा विधानसभा मतदारसंघ महिलांसाठी राखीव व्हावा, यासाठी अस्तित्व संघटनेच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या प्रेमलता सोनोने पाटील यांनी पक्षाकडे हालचाली सुरू केल्या आहेत.

बुलढाणा मतदार संघ राखीव झाला तर आमदार गायकवाड यांची कोंडी होऊ शकते. राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान आणि विदर्भपंढरी म्हणून बुलडाणा जिल्ह्यात शिवसेनेने आजपर्यंत महिलांना उमेदवारी दिली नाही.त्यामुळे बुलडाणा – मोताळा विधानसभा मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी,अशी मागणी अस्तित्व संघटनेच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या प्रेमलता सोनोने पाटील यांनी पक्षाकडे केली आहे.

सोनोने पाटील यांनी म्हटले आहे की, आपण जनसेवक असून राजकीय प्रवास जनहितासाठीच सुरू केला आहे. राजमाता
जिजाऊंचे जन्मस्थान आणि विदर्भ पंढरी म्हणून जिल्ह्याची ओळख आहे.जिल्ह्यात एक तरी मतदारसंघ कायमस्वरूपी महिलांसाठी राखीव ठेवावा.जिल्ह्यात आजपर्यंत शिवसेनेतील महिलेला उमेदवारी दिलेली नाही, त्यामुळे बुलडाणा – मोताळा विधानसभा मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी अशी मागणी आहे.मी विधानसभा लढावी ही महिलांची आणि जनतेची इच्छा आहे.शेतकऱ्यांचे प्रश्न, महिला सक्षमीकरण, युवकांना रोजगार, शिक्षण यासह विविध मुद्द्यांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले असून मतदारसंघात समृद्धी संपन्नता व सलोख्याचे वातावरण कायम राहावे यासाठी काम करणार असल्याची ग्वाही प्रेमलता सोनोने यांनी दिली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!