चांडोळ (हॅलो बुलढाणा/ सलमान नसीम अत्तार) ग्रामविकास अधिकारी यांच्याशी हुज्जत घालत शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी चांडोळ येथील एका विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संतोष रामदास खराटे असे आरोपीचे नाव आहे.
चांडोळ येथील खराटे हा आरोपी शुक्रवारी दुपारी 1 वाजता ग्रामपंचायतमध्ये आला. दरम्यान ग्रामविकास अधिकारी संदीप शिंदे यांच्याशी ‘घरपट्टी, ‘नळपट्टी’ घेऊ नका.. या विषयावरून हुज्जत घालत
‘तुम्ही भ्रष्टाचार केला’ असा आरोप करीत,अरेरावीची भाषा करू लागला. शिंदे यांच्या हातातील शासकीय दस्तावेज हिसकावून फेकून देत धमकी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान
शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी धाड पोलिसांनी आरोपी संतोष रामदास खराटेवर अपराध नंबर 237/2024
कलम132(1)353,351(2)नुसार गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास धाड पोलीस स्टेशन ठाणेदार नरेंद्र पेंदोर यांच्या मार्गदर्शनखाली संदीप कायंदे, पोहेकॅ. संदीप सुरडकर करीत आहे.












Total Users : 3417911